साहित्य :- दोन लोड आणि एक छोटी पातळ उशी. मांडणी :- एक लोड आडवा आणि एक लोड उभा असे एकमेकांना जोडून जमिनीवर 'T' इंग्रजी अक्षर तयार करावे.
कृती :- १) उभ्या लोडाच्या मोकळ्या टोकावर (साधारण लोडाच्या मध्यभागी) आडव्या लोडाकडे पाठ येईल अशाप्रकारे बसावे.
२) पाय लोडाच्या दोन्ही बाजूंना गुडघ्यात दमडून उभे ठेवावे
. ३) आता दोन्ही हात मागे नेऊन आडवा लोड हलू नये म्हणून पकडून ठेवावा. |
४) ताठ बसावे व सावकाश पाठीचा कणा मागे लोडवर टेकवत मागे झोपावे.
५) पावलांवर थोडासा जोर देत, आपले शरीर आडव्या लोडाच्या दिशेने एवढेच वर ढकलावे ज्यायोगे फक्त खांदे जमिनीवर येतील.
६) आता मानेखाली छोटी पातळ उशी घ्यावी. प्रकाशकः
७) हात खांद्याच्या रेषेत सरळ करावे.
८) आता दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता उभ्या लोडावर सरळ ठेवावे. पायाची बोटे स्वतःकडे ओढून टाचा पुढे ढकलाव्यात.
९) सामान्य श्वसन ठेवत या आसनात १० मि. थांबावे. आसन सोडताना :- १) पाय लोडाच्या दोन्ही बाजूंना गुडघ्यात उभे करावे. २) पावलांनी थोडासा जोर देत शरीर आडव्या लोडावरून घसरत खांद्याकडे न्यावे. ज्यायोगे कंबर जमिनीवर येईल आणि आडवा लोड गुडघ्यांच्या खाली येईल.